अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने जिल्ह्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयाच्या कामकाजामध्ये बदल करण्यात आला आहे.
आज (सोमवार) पासून न्यायालयाची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 अशी असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने आजपासून पुन्हा निर्बंध वाढवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील न्यायालयाच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे.
याबाबतचे आदेश प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी काढले आहेत. सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. यावेळेत महत्वाची फौजदारी, दिवाणी प्रकरणांसह रिमांड प्रकरणांची सुनावणी चालणार आहे.
सुनावणीवेळी वकिल, पक्षकार, साक्षीदार, आरोपी गैरहजर असेल तर त्याबाबत विरूद्ध आदेश पारित करू नये. प्रत्येक शनिवारी न्यायालयाचे कामकाज (रिमांड वगळता) बंद राहणार आहे.
न्यायालयाची वेळ 11 ते 2 अशी असल्याने त्यानंतर न्यायालयातील पार्किंगमध्ये कोणतेही वाहन आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. ज्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाला असेल त्या प्रकरणांचा निकाल जाहीर करण्यास हरकत नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
न्यायालयातील कॅन्टींग, बाररूम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून 50 टक्के उपस्थितीवर कामकाज चालणार आहे. सदरचा आदेश आज (सोमवार) पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम