अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- एखाद्या राजकीय नेत्याच्या चाहत्यांसह समर्थकांचं त्या नेत्याप्रती असणारं वेड हे अनेकदा आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरतं. सध्या असंच काहीसं चित्र कोपरगावमध्ये पाहायला मिळालं.
राज्यासह देशातील बहुचर्चित असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके हे कोपरगाव शहरात रात्री अडीच वाजता दाखल झाले त्यावेळी इथं त्यांचं जंगी स्वागत त्यांच्या चाहत्यांच्या वतीने करण्यात आलं.
त्यांच्या स्वागतासाठी इथं मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. शिवाय लंकेप्रती कार्यकर्ते आणि समर्थकांचं प्रेम इथं एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळालं.
निलेश लंके या ठिकाणी दाखल होताच त्यांना भव्य व मनमोहक पुष्पगुच्छ,हार देण्यात आले .यावेळी भाजपचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,माजी नगराध्यक्ष विनोद राक्षे, किरण सूर्यवंशी,प्रणव वाणी, नितीन वानखेडे,रणजित लांडे,
राहुल हासवाल,भूषण वडांगळे,अभिषेक कोकाटे,निशांत झावरे, आदित्य गुजराथी, वासुदेव शिंदे,सागर,पवार,विनोद परदेशी,संदीप देशपांडे,संदीप जाधव,कुणाला घनघाव,निलेश शिंदे,संदीप देशपांडे,राहुल देशपांडे,
पत्रकार शैलेश शिंदे,कुणाल जायकर,राहुल देवरे अँड.राहुल झावरे,दादा शिंदे,बाबापू शिर्के, अशोक घुले,राजेंद्र चौधरी,सचीन पेटारे,सुनिल कोकरे,अविनाश जाधव,गणेश साळवे, बाळासाहेब ब्राह्मणे,भाऊसाहेब रासकर,
भाऊ साठे,सत्यम निमसे,दादा दळवी,प्रवीण वारुळे आदींसह मोठ्याप्रमाणावर लंके यांचे चाहते उपस्थित होते. यावेळी निलेश लंके म्हणाले की, संपूर्ण आयुष्य हे जनसेवेसाठी वाहून घेतलेले असून करोना काळात केलेले काम हे माझे कर्तव्यच होते.
जर मी घाबरून घरात बसलो असतो तर इतके लोकं बरे होऊन जाऊ शकले नसते.समाजच आपण काही तरी देणं लागतो या उदात्त भावनेतून मी समाजातील जनतेची सेवा करत आहे.ही कामे करताना डोळ्यासमोर प्रत्येक माणूस वाचला पाहिजे हेच उद्दीष्ठ होते.
मी माझ्या कुटुंबातील व्यक्तींना वाचवलेलं असून मी फार वेगळे काम केलेले नाही.माझं काही झालं तरी चालले पण प्रत्येक माणूस वाचवणे हे आमचे काम आम्ही केले.जर मी त्या लोकांमध्ये गेलो नसतो तर ते लोक वाचले नसते.
त्यामुळे मी जीवावर उदार होऊन करोना रुग्णांची सेवा केली आहे.मी लोकांचे अश्रू पुसण्यासाठी व समाजासाठी माझं आयुष्य खर्च करत आहे.तसेच प्रत्येकाने आपल्या स्वतःसह परिवार व नातेवाईकांची काळजी घेतली तर
आपल्याला जा जागतिक महामारी ठरलेल्या करोना या संकटांना सामोरे जातांना मदत होईल.तसेच शरदचंद्र पवार करोना मंदिरयेथें आम्ही तिसरी लाट जरी आली तरी त्याला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत असेही शेवटी आ. लंके म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम