नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ‘या’ पालिकेकडून दुकानांवर दंडात्मक कारवाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोपरगाव पालिकेने बुधवारी (ता.३०) शहरातील विविध दुकानांवर दंडात्मक कारवाई करून १४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

अवघ्या जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूंची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता लक्षात घेता राज्य शासनाने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत.

यामध्ये सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अत्यावश्यक वगळता इतर दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

तसेच शनिवार व रविवार कडक (अत्यावश्यक वगळता) लॉकडाऊन लागू केलेला आहे. तरी देखील कोविड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर कोपरगाव पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील विविध दुकानांवर कारवाई करून १४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

या धडक कारवाईने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली असून, यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe