इंदुरीकर महाराज म्हणतात सोशल मीडियामुळे माझी चांगली जिरली!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   आई-वडिलांची संस्कृती खरी महत्त्वाची संपत्ती आहे. मुला-मुलींना चांगले संस्कार द्या, तेच तुमच्या भविष्यकाळात कामी येतील. मात्र आता कोणी माझी शूटिंग काढू नका आणि मेहरबानी करून युट्युबवर, सोशलमिडीयावर टाकू नका रे. या सोशल मीडियामुळे माझी चांगली जिरली आहे.

मला खूप मानसिक त्रास झाला अशी खंत समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी व्यक्त केली. कोरोना महामारीमुळे आमच्या सारख्या वारकरी संप्रदायात काम करणाऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

या कोरोनामुळे माणसं,नातेवाईक, नातीगोती देखील विसरली. माणुसकीच्या नात्यातून पुन्हा एकत्र येण्यासाठी बंद झालेले भजन-कीर्तन नामस्मरण पुन्हा पूर्ववत सुरू झाले पाहिजे.

माणसांच्या कानी नेहमी चांगले ऐकू आले पाहिजे, तरच त्याचे विचार सकारात्मक बनतात आणि तो नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न करतो.

त्यामुळे मंदिर देखील उघडली पाहिजेत नियमित आरत्या सुरू झाल्या पाहिजेत असे ते म्हणाले. समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पाथर्डी तालुक्यात एका ठिकाणी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe