अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- पुरुषप्रधान देशात आजही महिलांवर अत्याचाराच्या प्रमाणात घट होण्यास तयार नाही. सुशिक्षित लोक देखील आता अशिक्षिता प्रमाणे वागू लागली आहे.
लग्न करून आलेली सून म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असेच प्रकार सासरच्या मंडळींकडून होत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. असाच काहीसा प्रकार जिल्ह्यात घडला आहे.

सासरी नांदत असताना नवीन घर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख आणावेत, यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला घराबाहेर काढले. ही घटना विवाहितेच्या सासरी मोरपंख सोसायटी चिखली पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे घडली आहे.
या प्रकरणी कोपरगाव येथील मूळची राहणारी हिना इरफान तांबोळी (वय २५, रा.मोरपंख सोसायटी चिखली, पिंपरी चिंचवड, पुणे ह.रा.इंदिरानगर कोपरगाव) हिच्या फिर्यादीवरून इरफान रफीक तांबोळी,
फहमीदा रफीक तांबोळी, रफिक सुलतान तांबोळी (तिघे रा.चिखली पिंपरी चिंचवड, पुणे) सना आसीफ तांबोळी, राजू अब्बास तांबोळी,
अनिसा राजू तांबोळी (रा. नाशिक), साहीस्ता आसीफ तांबोळी (रा.नारायणगाव, पुणे) यांच्यावर मंगळवारी (दि.६) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













