अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- तत्कालिन अपर पाेलिस अधीक्षक दत्ताराम राठाेड यांच्या पथकातील निलंबित केलेल्या पाेलिसांना पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती देण्यात अाली अाहे.
बनावट डिझेल प्रकरणात कारवाई करून गुन्हा दाखल करण्यास विलंब तसेच तडजोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पथकातील एका पाेलिस अधिकार्यासह ७ कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. तसेच इतर कारणातून निलंबित ३ कर्मचाऱ्यांना देखील पुन्हा सेवेत घेतले आहे.
तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने २६ ऑक्टोबर रोजी भिंगार पोलिस स्टेशन हद्दीतील जीपीओ चौकात बनावट डिझेल साठ्यावर छापा टाकला होता. याप्रकरणात काही आरोपींना अटक देखील झाली.
त्यावेळी दुपारी झालेल्या कारवाईचा गुन्हा रात्री उशिरापर्यंत दाखल न झाल्याने त्यांच्या पथकातील पाेलिस कमचाऱ्यांचे निलंबित केले हाेते. बनावट डिझेल प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांना दिले होते.
मदने यांनी पोलिस अधीक्षकांना अहवाल सादर केल्यानंतर राठोड यांच्या पथकातील एका अधिकाऱ्यांसह सात पोलिस कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई केली होती.
बनावट डिझेल प्रकरणात गुन्हा दाखल करताना विलंब तसेच तडजोडीचा प्रयत्न करण्यात येऊन कागदपत्रांमध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलिस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी,
हेड काॅन्स्टेबल भरत डंगोरे, गणेश डहाळे, राजाराम शेंडगे, अरविंद भिंगारदिवे, अजित घुले, संदीप धामणे, विनोद पवार यांना निलंबित केले.
यांच्यासह मुख्यालयातील पोलिस नाइक राजू चव्हाण, हेड काॅन्स्टेबल शंकर रोकडे व अकोले पोलिस ठाण्यातील प्रवीण अंधारे यांच्यावरील कारवाई देखील मागे घेण्यात आली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम