अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीनंतर पालकमंत्री मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते.पत्रकार परिषद सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आला.
माईकचा आवाज बंद करून त्याना पवारांशी बोलाव लागले. फोन ठेवल्यानंतर ते म्हणाले उपमुख्यमंत्र्यांचा फोन होता. नगरबद्दल उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना होत्या, असे त्यांनी सांगितले. मात्र पत्रकार परिषदेत काय सूचना होत्या, ते सांगण्यास त्यांनी नकार दिला.
दरम्यान पालकमंत्री मुश्रीफ यांनी कृषी यंत्रणेकडून जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी, पेरणी झालेले क्षेत्र, पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील पेरणी क्षेत्रावर होणारा परिणाम याचा सविस्तर आढावा घेतला.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार नाही आणि पुरेसा पाऊस पडेल, अशी आशा करुया, असे त्यांनी सांगितले. पाऊस आठवडाभर लांबला, तर मूग आणि उडीदाची दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.
मात्र, पाऊस वेळेवर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधी जोपर्यंत आहेत, तोपर्यंत सरकार पाडण्याची हिंमत नाही. शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांच्या निवडीबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय घेण्यात येईल.
त्यासाठी काही बदल आम्ही केलेला आहे. यादी बदलली का, या बद्दल विचारले असता यादी श्रेष्ठींना माहित आहे, असे त्यांनी सांगितले. आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणसह पुरेशा ऑक्सिजन निर्मितीला प्राधान्य दिल्याचे सांगितले.
डॉ. शेळके आत्महत्या प्रकरण, संचारबंदी याबाबतच्या प्रश्नावर मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती देण्याचे सांगितले. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,
पोलिस प्रमुख मनोज पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, ऊर्मिला पाटील, रोहिणी नऱ्हे, जयश्री आव्हाड, उज्ज्वला गाडेकर,
जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे, अन्न व औषध प्रशासन उपायुक्त अशोक राठोड, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम