जिल्ह्यातील सर्वच मंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  जिल्ह्यातील सर्वच मंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले असल्याचा आरोप माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केला आहे.

दरम्यान मुळा धरणातून शेतकर्‍यांसाठी आवर्तन सोडावे अशी मागणीचे निवेदन मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.

शेतकर्‍यांनी पेरण्या केल्यानंतर पाऊसाने दडी मारली आहे. 15 ते 20 दिवसापासून पाऊस गायब झाला असल्यामुळे शेतकर्‍यांची उभी पिके जळू लागली आहे.

शेतकरी आधीच कोरोना महामारीच्या संकटात सापडला असल्याने आर्थिक अडचणीत आहे. शेतकर्‍यांची पिके वाचविण्यासाठी मुळा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातुन शेती साठी अवर्तन सोडावे, शेतकर्‍यांनच्या हाता तोंडाला आलेले उभी पिके जळून चालली आहे.

येत्या आठ दिवसात शेतीसाठीचे आवर्तन सोडावे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांना देऊन चर्चा केली.

यावेळी रितेश भंडारी, तुळशीराम झगरे, भाऊराव नगरे, अमित गटने आदी उपस्थित होते. मी आमदार असताना मुळा धरणातून वेळेवर शेतकर्‍यांसाठी आवर्तन सोडली होती.

तरीसुद्धा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी यांनी रस्त्यावर उतरून स्टंटबाजी करत आंदोलन केले होते. आता तर ते राज्याच्या सरकार मध्ये जलसंधारण मंत्री आहेत. त्यांनी नेवासा तालुक्यातील जनतेची दिशाभूल केली आहे.

शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत त्यांना आता विसर पडला असल्याचा आरोप आरोप माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केला. येत्या आठ दिवसांमध्ये मुळा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून शेतकर्‍यांसाठी आवर्तन सोडावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe