अरे… अरे ! अन दोन महिन्यातच त्यांचा संसार विस्कटला !

 

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- अवघ्या दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ  उडाली आहे.हि घटना कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात घडली.

राणी किरण चंदनशिव असे त्या मृत नवविवाहितेचे नाव आहे. कोपरगाव तालुका पोलिसांनी महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून ही घटना हुंडाबळीची असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्यानुसार  सासू , सासरे, नवरा, दीर, भाया आदींना ताब्यात घेतले आहे. चौकशीतून हत्या की आत्महत्या याबाबत उलगडा होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच राणी चंदनशिव  या तरुणीचे लग्न दोन महिन्यांपूर्वी धारणगाव येथील किरण चंदनशिव याचे बरोबर झाले होते.

सदर तरुण नाशिक जिल्ह्यातील एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करत असून त्यास नाशिक येथे राहण्यासाठी घर घेण्याची इच्छा होती.

त्यातून त्याने पत्नीला माहेराहून पन्नास हजार रुपये आणावेत यासाठी दबाव आणला होता. यातून ही घटना घडल्याची माहिती धारणगाव परिसरातील नागरिकांत आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून ते याबाबत अधिक तपास करत आहेत .