अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्र होणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांनी मतांसाठी मराठा समाजाचा वापर करू घेत आहे,
समाजाच्या न्याय हक्कासाठी, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणताही राजकीय नेता पुढे येत नाही, यासाठी समाजाला एकत्रित करणे गरजेचे आहे.
युवकांच्या माध्यमातून मराठा समाजाला एकत्रित केले जाईल, मराठा समाजातील गोर-गरीब शेतकऱ्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
यासाठी शैक्षणिक आरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठीच भारतीय मराठा महासंघ समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सार्वत्रिक निवडणुका लढविणार आहे.
मराठा समाजाचा वापर केवळ मतासाठीच केला, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आप्पासाहेब आहेर यांनी केले.
भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्षपदी सोपान तात्या कदम यांची निवड झाली.यावेळी डॉ. आहेर बोलत होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम