शिवसैनिकांना कोणत्याही प्रकारचा पोरकेपणा जाणवू देणार नाही – मंत्री शंकराव गडाख

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- पाथर्डी तालुक्यातील शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ओळखल्या जाणारे जिल्हा परिषद सदस्य अनिलराव कराळे व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहनराव पालवे यांच्या निधनामुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

परंतु यापुढील काळात तालुक्यातील शिवसैनिकांना कोणत्याही प्रकारचा पोरकेपणा जाणवू देणार नाही, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रफिक शेख यांनी शिवसंपर्क अभियान कार्यक्रमाचे नेटके नियोजन केल्याने या अभियानाची करंजीसारख्या गावातून सुरू झाल्याचे समाधान मृद व जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने राज्यात सुरू करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात करंजी येथून झाली.

यावेळी शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, शिवसेना नेते डॉ. विजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उषा कराळे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके, उपतालुकाप्रमुख भारत वांढेकर, सुरेश वाघ, पंकज लांबहाते, शिवसेना नेते उद्धव दुसंग, एकनाथ झाडे,

भागिनाथ गवळी, जगदीश सोलाट, सुधाकर वांढेकर, शिवाजी मचे, दिलीप वांढेकर, सरपंच सतीश कराळे, प्रमोद गाडेकर, विलास टेमकर, गणेश पालवे, प्रकाश जगदाळे, अरुण भंडारे, किरण जाधव, गोकूळ लोंढे, बाळासाहेब घुले,

बाळासाहेब कराळे, अशोक मिसाळ, गणेश तुपे, अंबादास टेमकर, बाळासाहेब टेमकर, अंबादास वारे, शरद गवळी, लक्ष्मण भानगुडे, सुरेश बर्फे, दत्तू कोरडे, सुनील कोरडे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!