अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यातिल नागरिकांवर आता डेंग्यूचे संकट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  कोरोना संसर्ग रोखण्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अकोलेकर सकारात्मक प्रतिसाद देत असतानाच आता डेंग्यूच्या विळख्यात ते सापडल्याने हवालदिल झाले.

शहरातील जुनी मुख्य बाजारपेठ व पाटील वेस, गुजरी बाजार, कालिका मंदिर, जगदंबा मंदिर परिसरातून, तसेच कासारगल्ली, अगस्ती चित्रमंदिर परिसर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते मध्यवस्तीतील सुमारे २५ ते ३० आबालवृद्ध अकोलेकर नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याने हैराण झाले

असून त्यांच्यावर शहरातील विविध खाजगी रुग्णालयातून उपचार करण्यात येत आहेत. सुरुवातीला अकोल्यातील गुजरी बाजार परिसरातून डेंग्यूचे रुग्ण आढळले. शहरातून पडायला झालेल्या इमारतीतून व मोडकळी अवस्थेतील बखळीमधून साचलेली घाण, कचरा व इतस्ततः वाढलेले गवत यामुळे या भागांतून डासांचा प्रादूर्भाव खूप वाढला.

सद्यस्थितीत शहरातील प्रभाग क्रमांक ३, ४, ५ व ६ मधून मोठ्या संख्येत डेंगूचा प्रादुर्भाव झाला असून दररोजच डेंगूचे नवनवीन रूग्ण सापडत आहेत. नगरपंचायतकडूूून अजूनही यावर लवकरात लवकर उपाययोजना केल्यास नागरिकांची आरोग्य परिस्थितीत हाताबाहेर जाण्यापासून रोखल जाऊ शकेल.

नगरपंचायतकडूूून ताबडतोब रोग नियंत्रणात आणण्यात निर्जंतुकीकरण होण्यास फवारणी करून डासांचा बदोबस्त करावा, गटारावरील गवत वाढले, ते काढून परिसर स्वच्छ करावा. थोड्याच दिवसांत अकोले नगरपंचायतच्या आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीचा लेखाजोखा जनतेसमोर येईलच.

अकोले नगरपंचायतच्या आरोग्य विभागाच्या करामती व नागरिकांच्या पैशांचा कशा प्रकारे गैरवापर करून जनतेची लूट केली जाते ते लवकर सर्वासमोर येईल, असे काँग्रेसचे निखिल जगताप यांनी सांगितले.