अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर 50 ते 60 किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. 23 तारखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा हवामान विभागाने इशारा दिला आहे.

तर रत्नागिरीतही मुसळधार पाऊस बरसणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीला कालरात्रभर मुसळधार पावसाने झोडपले आहे. आजही ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
काल मुसळधार पावसामुळे मुंबईत दरडी कोसळून 33 बळी गेले आहेत. चेंबूरमध्ये 21 तर विक्रोळीत 10 तर भांडूपमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारची 5 लाखांची तर केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत जोरदार वादळी पाऊस झाला आहे. रविवारी पहाटेपर्यंत मुंबईत 200 मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडला आहे. मुसळधार पावसाचा फटका हा वसई-विरार शहराला बसला आहे. विरारमधील जाधव पाडा येथील चाळीत पाणी शिरले होते.
यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. यात अडकून पडलेल्या नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम