कोर्टाच्या निकालानंतर ईडीसमोर स्टेटमेंट देईन”

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- मला ईडीचा समन्स आला होता. समन्स आल्यानंतर मी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. कोर्टाचा जो काही निकाल येईल.

त्यानंतर मी ईडीसमोर माझं स्टेटमेंट देईन, असा खुलासा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. मागील आठवड्यात बजावण्यात आलेल्या समन्सपासून देशमुख नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचा शोध ईडीकडून घेतला जात आहे.

माजी गृहमंत्री देशमुख यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी आपली बाजू मांडली आहे. तसेच ईडीसमोर कधी हजर होणार याबाबतही खुलासा केला आहे. या व्हिडिओत त्यांनी म्हटले आहे की, ईडीने माझ्या कुटुंबियांची ४ कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

चार कोटींच्या जप्त केलेल्या मालमत्तेत माझ्या मुलाने २ कोटी ६७ लाखामध्ये २००६ मध्ये जी जमीन घेतली होती. ती २ कोटी ६७ लाखाची जमीनही जप्त केलेली आहे. मात्र ३०० कोटीची असल्याचं सांगून काही जण गैरसमज पसरवत आहेत.

मला ईडीचा समन्स आला होता. समन्स आल्यानंतर मी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. कोर्टाचा जो काही निकाल येईल.

त्यानंतर मी ईडीसमोर माझं स्टेटमेंट देईन, दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती.

त्यामुळे काही महिन्यांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीच्या रडावर आहेत. देशमुख यांच्या मालमत्तांची झाडाझडतीही ईडीकडून केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe