धक्कादायक ! तंत्र मंत्राद्वारे दुप्पट पैसे करून देणारे अटकेत ; तब्बल ‘इतक्या’ लाखांना गंडा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- राजधानी रायपुरमध्ये अनोख्या पद्धतीने 5 लाख रुपयांच्या फसवणूकीचा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या फसवणूकीच्या प्रकरणात तंत्र-मंत्रांच्या नावाखाली पैशांत 10 पट वाढ करण्याचे लालूच दाखवले होते.

या पार्श्वभूमीवर तंत्र मंत्राद्वारे दुप्पट पैसे देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक करणार्‍या पती, पत्नी आणि मेहुणा यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भोपाळ येथील रहिवासी मोबाईल कंपनीत काम करणाऱ्या राम ठाकूर यांना एक हजार रुपयांना 15 हजार बनवून देऊ असे सांगितले.

त्यानंतर राम लालच मध्ये आल्यानंतर तो राजधानी रायपूर येथे आला आणि शातिर आरोपी नरेंद्रसिंग ठाकूर, रेखासिंह ठाकूर आणि नीलेश सोनपिपरेसमवेत नया रायपूर येथे गेला आणि त्यांना तंत्र-मंत्र करण्यासाठी पाच लाख रुपये दिले,

त्यावर आरोपींनी तोंड बंद असलेले भांडे देऊन दोन दिवसानंतर उघडण्यास सांगून पसार झाले. जेव्हा आरोपींनी सांगितल्याप्रमाणे दोन दिवसांनी रामने मटका उघडला तेव्हा त्यात गवत होते, त्यानंतर पोलिसांनी तिखटपारा येथील हॉटेलमधून तिन्ही टोळीतील आरोपींना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी रिसाली भिलाई येथील रहिवासी असून त्यांनी राज्यभरात शंभराहून अधिक लोकांची या प्रकारे फसवणूक करुन कोट्यवधी रुपये लुबाडले आहेत. सद्यस्थितीत पोलिसांनी आरोपींकडील एक भांडे व कार जप्त केली असून 70 हजारांची रोकड जप्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News