अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- जिल्ह्यात हनीट्रॅपचे जाळे विखरू लागले आहे. नुकतेच अकोले तालुक्यातील शेती व्यवसाय करणारा एक पुरुष सोशल मीडियाच्या माध्यमातून हनीट्रॅप करणाऱ्या दोन महिलांच्या जाळ्यात अडकला होता.
हनीट्रॅपची शिकार झालेल्या शेतकऱ्याने १८ जुलै रोजी फिर्याद दिल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. शीतल किरण खर्डे व गणेश छगन गिऱ्हे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक अशी कि, फिर्यादीशी शीतल खर्डे हिने फसवणुकीच्या उद्देशानेच ओळख वाढविली होती. १५ जून रोजी सायंकाळी फिर्यादीस शीतल हिने तिच्या वडगावगुप्ता येथील घरी बोलावून घेतले.
तेथे त्याच्याशी जवळीक साधून फोटो काढले. घरात हे दोघे एकत्र असतानाच त्या वेळी एक तरुण तेथे आला. तो तरुण शीतल हिचा पती आहे आणि दोघांना एकत्र पकडले असे भासविण्यात आले.
शीतल आणि तिच्या साथीदाराने फिर्यादीस मारहाण करून त्याच्याकडील ५ हजार रुपये हिसकावून घेतले.
तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून गणेश गिऱ्हे याच्या मध्यस्थीने रोख दोन लाख रुपये उकळले. दरम्यान, पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतलेल्या तिसऱ्या आरोपीचा या गुन्ह्यात कसा सहभाग राहिला आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
हनी ट्रॅप म्हणजे काय? ;- एखाद्याकडून गुप्त माहिती काढण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी महिलांचा वापर करुन त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे याला हनी ट्रॅप म्हणतात.
मॅच फिक्सिंग प्रकरणात बुकींकडून असा ‘हनी ट्रॅप’ लावल्याचे नुकतेच समोर आले होते. मंत्री, व्यावसायिक, खेळाडू या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची अनेक उदाहरणे आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम