अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दिली आहे आरोपींमध्ये गौरव राजेंद्र शेवाळे वय-२२ वर्षे रा दुधसागर सोसायटी केडगांव नगर ,शरद चंदु पवार चय-२२ वर्षे रा.मतकरमळाजवळ दूबे यांचे खोलीत, देवीरोड केडगाव नगर ,
राहुल रामचंद्र बोरुडे वय २५ वर्षे रा. मोहिनीनगर केडगांव, नगर यांचा समावेश आहे दिनांक २१ जुलै रोजी यातील फिर्यादी सचिन बालाजी लेडवे वय-२४ वर्षे धंदा चालक से चक्रपाणी

वसाहत, दुर्गामाता कॉलनी भोसरी जि पुणे हे त्यांचे वाहनात त्यांचे हयुडाई कंपनीचे असेंट कार नं. एमएच १४ एफ सी ३९५४ हीमध्ये पुणे येथुन भाडे घेवून नगर शहरात आले असता
त्यांनी गाडीतील प्रवासी यांना नगर येथे सोडून पुन्हा पुणे जात असतांना नगर शहरातील नगर पुणे रोडवरील कायनेटीकचौकात रोडच्या कडेला त्यांची कार उभी करुन बाजुस विश्रांती करत असतांना तीन अनोळखी इसम वय अंदाजे २४ ते २५ वर्ष हे त्यांचेकडील सुझुकी अॅक्सेस मोपेड मोटारसायकलवर
येवून त्यांनी फिर्यादीचे कारचा दरवाजा वाजवुन तु कार येथे का उभी केली येथे पाकींग नाही असे म्हणुन लेंडवे याना थाबुक्यांनी मारहाण करुन त्यांच्या खिशातील ४,०००/-रु रोख रक्कम व २,००,०००/-रु किमतीची हुँदाई कंपनीची अॅसेंट कार ने एमएच १४ एक सी ३९५४ ही बळजबरीने घेवून गेले होते,
गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार हे केडगांव भागात आरोपींचा शोध घेत असतांना मा पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की गुन्हयातील आरोपी हे केडगाव परीसरात आले आहे
अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोधपथकाचे पोसई मनोज कचरे यांना तसे आदेश दिल्याने मिळालेल्या गुप्त बातमीनुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हयातील संशयित आरोपी
यांनी मोठ्या शिताफिने वरील तीन आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले. सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांचे ताब्यात गुन्हयातील २,००,०००/-रु किंमतीची हुंदाई कंपनीची अॅसेंट कार नं एमएच १४ एफ सी ३९५४ हस्तगत केलेली आहे .
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी . विशाल ढुमे . यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक राकेश मानगांकर सो, पोसई मनोज कचरे, पोसई मनोज महाजन,
पोना योगेश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे, पोना नितीन शिंदे, पोना सागर पालये, पोना नितीन गाडगे, पोना शाहीद शेख, पोना बंडु भागवत, पोकॉ सुजय हिवाळे, पोकों तान्हाजी पवार, पोकों सुमित गवळी,
पोकों कैलास शिरसाठ, पोकॉ प्रमोद लहारे, पोकॉ सोमनाथ राऊत, पोकॉ सुशील वाघेला, पोको भारत इंगळे करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम