अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफअहमदनगर प्रियदर्शिनीच्या वतीने भविष्यातील करिअरच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने मी कोण होणार? या ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि.24 जुलै रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत झुम अॅपवर हा निशुल्क वेबीनार होणार असून, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन क्लबच्या अध्यक्षा शशी झंवर, सचिव देविका रेळे व व्होकेशनल सर्व्हिस डायरेक्टर कुंदा हलबे यांनी केले आहे.

या ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीरात विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये पहिले अॅड. नीलमणी गांधी कायदे विषयक व्यवसाय संधी, ग्राहक संरक्षण या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.
तसेच परदेशी विद्यापीठामध्ये शिक्षण व करिअर, आर्किटेक्चरमधील संधी, ऑनलाईन व्यापार व देशाच्या संरक्षण सेवेत प्रवेश इत्यादी विषयावर तज्ञ मंडळी बोलणार आहेत. प्रत्येक सेशनमध्ये प्रश्नोत्तरांसाठी युवकांना संधी दिली जाणार असून,
त्यांच्या प्रश्नावर देखील संवाद साधला जाणार आहे. वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी झुम मिटिंग आयडी- 6269293544 , पासवर्ड आरआयडी- career (करिअर) देण्यात आला आहे. वेबीनार पहाण्यासाठी यु ट्यूब लाईव्ह लिंक https://bit.ly/3xYzMTe देण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम