मंत्र्यासमवेत फोटो काढून तुम्ही जनतेची दिशाभूल केल्यामुळे नागरिकांवर हि वेळ आली…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- सत्ताधारी आमदार असताना त्या सत्तेचा उपयोग मतदार संघाच्या विकासासाठी कसा करायचा हे आमदार आशुतोष काळे यांनी दाखवून देताना

शहरातील पाच नंबर साठवण तलाव, गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न, उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न दीडच वर्षात मार्गी लावून दाखवला ते देखील कोरोनाचे संकट असताना.

मात्र याउलट मागील पाच वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकहाती सत्ता असताना पाच वर्षात फक्त मंत्र्यासमवेत फोटो काढून तुम्ही जनतेची दिशाभूल केल्यामुळे आज कोपरगाव शहरातील नागरिकांवर हि वेळ आली.

राज्यात व केंद्रात तुमचीच सत्ता असताना तुम्ही सपशेल अपयशी ठरल्या. हे तुमचे अपयश खोटे आरोप करून झाकले जाणार नाही,

अशी टीका काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यावर पत्रकाद्वारे केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe