पोलिसांच्या आक्रमक कारवायांनी अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  नगर जिल्ह्यासह शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली असून शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. यातच जिल्ह्यातील ठिकठिकाणी हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे आहेत.

यामुळे गैरप्रकार वाढ लागले आहे. यांच्यावर वचक निर्माण व्हावा व या गोष्टींना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 11 जुलै ते 21 जुलै दरम्यान जिल्ह्यातील 36 ठिकाणच्या हातभट्टी दारू अड्ड्यावर छापेमारी केली.

या कारवाईदरम्यान हातभट्टी दारू, कच्चे रसायन, भट्टीचे साधने असा पाच लाख सहा हजार 880 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी 38 आरोपीविरोधात जामखेड, सोनई, नगर तालुका, श्रीरामपूर शहर, राहुरी,

कोतवाली, श्रीरामपूर तालुका, शिर्डी, भिंगार, कर्जत, शेवगाव, तोफखाना, एमआयडीसी, संगमनेर तालुका, पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक आश्‍वती दोर्जे,

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, श्रीरामपूरच्या अपर अधीक्षक दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe