मुळा धरण 44 टक्के भरले

Ahmednagarlive24
Published:

हमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणात (गुरुवार, 22 जुलै) रोजी सायंकाळी पाण्याचा साठा11 हजार 386 दशलक्ष घनफूट झाला आहे .

धरणाकडे 10 हजार 342 क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. मुळा धरण 11386(44टक्के) भरले आहे .मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे.

आज दिवसभर पाणलोट क्षेत्रावर ढगाळ वातावरण होते .अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. गेल्या काही दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे.

पाणलोट क्षेत्राबरोबरच लाभ क्षेत्रावरही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळण्याची मदत झाली आहे.

मुळा धरण आवक लक्षात घेता यंदा मुळा धरण100% भरण्याची चिन्हे आहेत .त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष पाण्याच्या पातळी कडे वेधले आहेत.

मुळा धरणात गेल्यावर्षीचा दोन हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा अतिरिक्त होता त्यामुळे यंदा मुळा धरण 100% भरण्याची चिन्हे शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe