अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काल नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शहराचा आढावा घेतला. यावेळी आयोजित बैठकीत काहींनी तक्रारीचा पाढा वाचून दाखविला. शहर भाजपाच्या बैठकीत काहींनी तक्रारी केल्या.
त्यावर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार असल्याचे सांगून पक्षाच्या विरोधात पत्रकबाजी, आरोप करणाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी करा, असा आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील सारडा महाविद्यालयात भाजपची आढावा बैठक झाली. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले,
बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, शहराध्यक्ष महेंद्र गंधे आदी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षात कोणीही परस्पर निर्णय घेणार नाही. प्रदेशकडून लोकसभा व विधानसभेचे उमेदवार ठरविले जातील.
स्थानिक पातळीवर कोणताही निर्णय होणार नाही. पक्षाच्या विरोधात कुणी काम करत असेल तर, त्यांची गय करू नका. त्यांच्यावर कारवाई करा, असा स्पष्ट आदेश पाटील यांनी आढावा बैठकीत दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम