अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- भारतीय समाजात मासिकपाळी व स्त्री या विषयाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत.धार्मिक रुढी व परंपरांचा समाजजीवनावर पगडा आहे.
जेथे या काळात स्त्रीलाच सार्यांपासुन लांब ठेवले जाते , तेथे मासिकपाळी दरम्यान सेक्स करावा की करू नये हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
तुमच्या मनातील अशाच काही शंका आणि त्याची उत्तरे जरुर वाचा. मासिक पाळीच्या काळात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. जर मासिक पाळीच्या काळात शरीर संबंध ठेवले तर ल्युब्रिकेशनची गरज नसते.
तसेच या काळात संबंध ठेवला तर मासिक पाळीचे प्रभाव कमी होतात. अनेक महिलांना मासिक पाळीच्या काळात शरीर आखडणे, अर्धशिशी, डोकेदुखी अशा तक्रारी असतात. जर या काळात शारीरिक संबंध केला तर त्या तक्रारी कमी होतात.
मासिक पाळीच्या काळात सुरक्षित संबंध करणे खूप आवश्यक आहे. कारण या काळात संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. दोघांपैकी एकाने गर्भनिरोधक साधनाचा वापर केला पाहिजे.
साधारणपणे योनीचा पीएच स्तर 3.8 ते 4.5 इतका असतो पण मासिक पाळीच्या काळात तो वाढतो, त्यामुळे यीस्ट अधिक वाढतात आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. डॉ. अर्चना निरुला यांनी सांगितलं,
मासिक पाळीच्या काळात शारीरिक संबंध केल्याने गर्भधारणा होण्याचा धोका नसतो. कारण या काळात महिलांमध्ये बीजफल होत नाही. उलट मासिक पाळी नंतर शरीर संबंध ठेवल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते.
तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं, परंतु मासिक पाळीदरम्याम सेक्स करणं आरामदायी ठरू शकतं. यामुळे स्त्रीयांमधील क्रॅम्प्सपासून दिलासा मिळू शकतो. तसेच पीएपसीच्या लक्षणांमध्येही दिलासा मिळतो.
लैंगिक संबधांवेळी किंवा त्यानंतर हार्मोन, एंडोर्फिन आणि स्ट्रेस बस्टिंग केमिकल्स तयार होतात. हे केमिकल्स मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी करू शकते. काही महिलांना मासिक पाळीदरम्यान, पोटाचा त्रास सुरू होतो.
रोजची जीवनशैली, व्यायाम न करणे, धुम्रपान, आणि मद्यसेवनामुळे हा त्रास होऊ शकतो. परंतु लैंगिक संबधांच्या परमोच्च आनंदामुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम