बाप-लेकीने ‘माउंट एल्ब्रुस’वर फडकविला भगवा !शिखरावर चढाई करणारी भारतातील पहिलीच..

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- महाराष्ट्राला अभिमान वाटावा आणि पिंपरी-चिंचवडकरांची मान देशात उंचवावी अशी कामगिरी भोसरीतील बाप-लेकीने करुन दाखवली आहे. युरोप खंडातील सर्वांत उंच मानले जाणारे माउंट एल्ब्रुस ज्याची उंची तब्बल ५ हजार ६४२ मीटर इतकी आहे.

हे शिखर सर करण्याची धाडसी मोहीम १२ वर्षीय गिरीजा लांडगे आणि तिचे वडील धनाजी लांडगे यांनी यशस्वी केली आहे. हे शिखर सर करणारी गिरीजा ही भारतातील पहिली मुलगी आहे असा दावा गिरिजाच्या वडिलांनी केला आहे. माउंट एल्ब्रुस हे युरोप खंडातील सर्वोच्च शिखर मानले जाते.

निद्रिस्त ज्वालामुखी म्हणूनही या पर्वताला ओळखले जाते. तेथील तापमान उणे २५ ते ४० डिग्रीपर्यंत असते. ‘माउंट एल्ब्रुस’ सर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण, मेहनत आवश्यक असते. गिर्यारोहकांच्या मनाचा अंत पाहणारा पर्वत ओळखला जातो. प्रचंड थंडी आणि वाऱ्याचे घोंगावणारे झोत अशा वातावरणाचा प्रसंगी सामना करावा लागतो. येथील वातावरण सतत बदलत असते.

त्यामुळे शारीरिक आणि मानसिक तयारी करूनच या मोहिमेची निवड करावी लागते, या सर्व संकटांचा सामाना करत या बाप-लेकीने भगवा पताका माउंट एल्ब्रुसवर फडकावला आहे. गिरीजाचे वडील धनंजय लांडगे म्हणाले की, शिखरावर चढाई करणारी गिरीजा महाराष्ट्रातील व भारतातली पहिलीच मुलगी आहे. एकूण १० दिवसांच्या मोहिमेत गिरीजा आणि मी आज सकाळी सात वाजता समिट सक्सेस केले.

आम्ही १५ तासांत माउंट एल्ब्रुस पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूने असणाऱ्या मार्गांनी समिट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वातावरण खराब असल्याने दोन्ही बाजूने समिट सक्सेस झाला नाही. ५६४२ मीटर पश्चिम बाजूने समिट सक्सेस करणारे जगातील पहिली बाप- लेकीचे जोडी आम्ही ठरलो आहे. या मोहिमेतून आम्ही ‘लेक वाचवा, लेक जगवा’ हा संदेश देत आहोत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News