तब्बल इतके दिवस ऑगस्ट महिना बँंका राहणार बंद !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- पुढील महिन्यात जवळपास १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना बँकेची कामे पूर्ण करण्यासाठी बँकांच्या कामकाज दिवसांची माहिती घेऊन नियोजन करावे लागणार आहे.

बँकांचा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. त्यातच ऑगस्ट महिन्यात आठ दिवस सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार सर्वच राज्यांना या आठ सार्वजनिक सुट्या नसतील. तसेच सर्वच राज्यांमध्ये सलग १५ दिवस बँका बंद राहणार नाहीत.

मात्र सार्वजनिक सुट्टया आणि शनिवार-रविवार असे जवळपास १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. तसेचं ऑगस्ट महिन्याची सुरुवात साप्ताहिक सुट्टीने होणार आहे. १ ऑगस्ट २०२१ रोजी रविवार आहे. त्याशिवाय ८ ऑगस्ट, १५ ऑगस्ट , २२ ऑगस्ट आणि २९ ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील.

त्याशिवाय दुसरा आणि चौथा शनिवार अनुक्रमे १४ ऑगस्ट आणि २८ ऑगस्ट रोजी असल्याने याही दिवशी बँका बंद राहणार आहेत. दरम्यान याशिवाय ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील आठ सार्वजनिक सुट्या आहेत . ज्यात १३ ऑगस्ट रोजी इंफाळमध्ये १३ ऑगस्ट रोजी पॅट्रियट डे निमित्त स्थानिक पातळीवर बँकांना सुट्टी असेल.

१६ ऑगस्ट रोजी पारशी नववर्षानिमित्त मुंबई आणि नागपूरमध्ये बँकांना सुट्टी असेल. १९ ऑगस्ट रोजी मोहरम निमित्त बँकांना राष्ट्रीय सुट्टी राहील.२० ऑगस्ट रोजी ओणमनिमित्त दक्षिण भारतात बँकांना सार्वजनिक सुट्टी राहील.

२१ ऑगस्ट रोजी थिरुओणम आणि २३ ऑगस्ट रोजी श्री नारायणा गुरु जयंतीच्या निमित्ताने कोची आणि तिरुअनंतपूरममध्ये बँका बंद राहतील. ३० ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी निमित्त बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe