अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर ऐज्यूकेशन संस्थेतील शिपाई महेश उध्दवगिरी गोसावी (वय ५० वर्ष ) यांनी राहत्या घरी आज सकाळी आत्महत्या केली आहे.
येथील महेश उध्दवगिरी गोसावी यांनी राहत्या घरी सकाळी आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली ते सकाळी अंघोळीला बाथरुममध्ये गेले होते

तेथेच त्यांनी स्वतःच्या हाताने धारदार शस्राने गळा कापून आत्महत्या केली बराच वेळ होवुनही ते बाहेर येत नसल्यामुळे घरातील लोकांनी दरवाजा उघडून पाहीला असता जखमी अवस्थेत असल्याचे लक्षात आले
त्यांना तातडीने साखर कामगार दवाखान्यात हलविण्यात आले तेथे डाँक्टरांनी त्यास मृत घोषित केले त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे बेलापुर पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोद केली असुन
पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालादार अतुल लोटके हे तपास करत आहे. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने जखम झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मात्र त्यांनी कोणत्या कारणाने जीवनयात्रा संपविली ते समजु शकले नाही. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले आहे.या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम