असा आहे अहमदनगर जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा, वाचा आजचे अपडेट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-भंडारदरा धरण पाणलोटात काल दुपारपासून आषाढ सरी जोरदार कोसळू लागल्याने या धरणातील पाणीसाठा 75 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

मुळा पाणलोटात अधूनमधून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुळा धरणात 4581 क्युसेकने आवक होत आहे. ता धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 14017 दलघफू होता.

भंडारदरा धरण परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. काल दिवसभर झालेल्या पावसाची नोंद 47 मिमी झाली आहे. घाटघर, पांजरे आणि रतनवाडीतही पावसाचा जोर टिकून आहे.

वाकी तलावातून 1022 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. अन्य ठिकाणचे पाणीही जमा होत असल्याने 8320 दलघफू क्षमतेचे निळवंडे धरण 37 टक्के झाले आहे.

या धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 2902 दलघफू झाला होता. हरिश्चंद्र गड, आंबित , पाचनई भागात आषाढ सरी अधूनमधून कोसळत असल्याने मुळा नदीतील पाणी टिकून आहे.

काल दिवसभरात धरणात नव्याने 142 दलघफू पाणी दाखल झाल्याने सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 14017 दलघफू झाला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe