अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- काही खाद्यपदार्थ व तोंडातील कोरडेपणा यामुळे तोंडात दुर्गंध येऊ लागतो.घराबाहेर असताना तो कमी करण्यासाठी प्रत्येकवेळी तुम्ही ब्रश करु शकत नाही.तोंड स्वच्छ करण्यासाठी बाजारामध्ये अनेक माऊशवॉशनर उपलब्ध आहेत.
मात्र घरातील काही नैसर्गिक पदार्थामुळे तोंडाचा दुर्गंध सहज दूर करता येतो.हे पदार्थ तुम्ही बाहेर जाताना देखील तुमच्या सोबत ठेऊ शकता. हे करा उपचार –

file photo
- १) डाळिंबाची साल डाळिंब फळाप्रमाणेच त्याची सालदेखील आरोग्यासाठी गुणकारी असते, त्याचे अनेक फायदे आहेत. या फळाची साल पाण्यात उकळून त्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंध येणे बंद होते.
- २) तुळशीची पाने घरोघरी दारात असणाऱ्या तुळशीचे औषधी गुणधर्म घरा-घरांत माहिती आहेत. तुळशीची पाने तोंडाला येणारा घाण वास घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुळशीची पाने चघळून खाल्याने तोंडाला येणारा घाण वास येणे बंद होते. त्यासोबतच तुळशी तोंडात आलेल्या अल्सरसारख्या समस्याही दूर करते.
- ३) सुके धणे खाणे हे एक चांगले माऊथ फ्रेशनर आहे. तोंडात धरून चावल्यास दुर्गंधी बरी होण्यास मदत होते.
- ४) बडिशेप आणि लवंग जर जेवणानंतर खाल्ली तर मुख दुर्गंधी येत नाही.
- ५) मिंट अथवा पुदीना बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक माऊथ फ्रेशनर्स मध्ये मिंट हा महत्वाचा घटक असतो.खाद्यपदार्थांच्या सजावटीसाठी पुदिन्याची पाने तुम्ही वापरु शकता.या पानांच्या ताज्या व थंडगार सुगंधामुळे तुम्हाला अधिक फ्रेश वाटू शकते.यासाठी पुदिन्याची काही पाने चघळा अथवा एक कप पुदिन्याचा चहा घ्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम