पेट्रोल-डिझेलबाबत मोठा दिलासा पण चिंता कायम ; जाणून घ्या आजचे दर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- मागील काही दिवसांमध्ये दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला अखेर लगाम बसल्याचे दिसत आहे.

कारण, गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. या काळात इंधन स्वस्तही झाले नसले तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील आश्वासक बाब मानली जात आहे.

परंतु सध्या जे दर आहेत ते अत्यंत जास्त असल्याने सर्वच लोक चिंतेमध्ये आहेत. मुंबईत सध्या प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.83 रुपये तर डिझेलसाठी 97.45 रुपये मोजावे लागत आहेत.

जाणून घ्या महानगरांतील आजचे लेटेस्ट रेट :-

– आता दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 101.84 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 89.87 रुपये आहे.

– कोलकातामध्ये आता 1 लिटर पेट्रोलची किंमत 102.08 रुपये आहे. तर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 93.02 रुपये आहे.

– आता मुंबईत 1 लिटर पेट्रोलची किंमत 107.83 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 97.45 रुपये आहे.

असे ठरवतात किंमत :- परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.

पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ? :- आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.

 पेट्रोल पंप डीलरचे कमीशन महाग करते इंधन :- डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe