नगर जिल्ह्यातील ‘या’ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  कोपरगांव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपा कोल्हे गटाचे मुस्लीम समाजाचे अरिफ करीम कुरेशी यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. त्याबददल त्यांचा व मावळते उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांचा जिल्हा बॅंकेचे संचालक व युवानेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी काम पाहिले. श्री. कुरेशी यांच्या नावाची सुचना जनार्दन कदम तर अनुमोदन शिवाजी खांडेकर यांनी दिले. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी म्हणांले की, कोल्हे कुटुंबियांचे सामाजिक कामाचे मुस्लिम समाजावर ऋण मोठे आहे,

वडील स्व. करीम कुरेशी यांच्या एकनिश्ठतेचे फळ त्यांच्यारूपांने आपणांस मिळाले असल्यांने माजीमंत्री शंकरराव कोल्हे, अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, सर्व नगरसेवक पदाधिकारी व युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शर्नांखाली काम करून शहर विकासात नागरिकांच्या संकल्पना पुर्ण करण्यांचा प्रामाणिक प्रयत्न करू.

मुस्लीम समाजाला कोल्हे कुटुंबीयांनी दिलेले पाठबळ आपण कदापीही विसरणार नाही, पालिकेसह शहरात भाजपा व कोल्हे गटाची ताकद वाढवुन अपेक्षीत ध्येय गाठू, मुस्लिम समाजाच्या संकटकाळात कोल्हे कुटुंबीयांनी खंबीरपणे दिलेली साथ मोलाची आहे, या ऋणातून उतराई होण्यासाठी शहर विकासाची जास्तीत जास्त कामे करून तो प्रयत्न करू असे सत्कार प्रसंगी बोलताना म्हणाले.

तर या निवडीकामी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, दिलीप दारूणकर, केशव भवर, अतुल काले, गटनेते रविंद्र पाठक, योगेश बागुल, कैलास जाधव, संजीवनीचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले, बाळासाहेब संधान, बाळासाहेब नरोडे, प्रदीप नवले,अल्ताफ कुरेशी, विनोद राक्षे, दिनेश कांबळे, राजेंद्र सोनवणे,

आर.पी.आय चे जितेंद्र रणशुर, दीपक जपे, वैभव गिरमे, बाळासाहेब आढाव, विवेक सोनवणे, रवि रोहमारे, भाजपा सेनेचे नगरसेवक विजय वाजे, ताराबाई जपे, एैश्र्वर्या सातभाई, संजय पवार, दिपा गिरमे, रेखा काले, सुवर्णा सोनवणे, मंगल आढाव, हर्शा कांबळे, विद्या सोनवणे, भारती वायखिंडे, अनिल आव्हाड, सत्येन मुंदडा, अरिफ कुरेशी, अलताफ कुरेशी, मोहसिन शेख, फारुक शेख, फकीर महंमद पैलवान, जावेद आत्तार,

खालीकभाई कुरेशी आदिंनी विशेष सहकार्य केले. शहर विस्तारीकरण मोठया प्रमाणांत होत असल्यांने नागरिकांच्या गरजा वाढत आहे त्याप्रमाणे विकासकामात सातत्य ठेवुन शहर विकास साधावा अशी अपेक्षा जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केली.

त्याचबरोबर मावळते उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा उल्लेख करत त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे म्हणांले की, अतिशय कमी वयात कोपरगांव पालिकेच्या उपनगराध्य क्षपदी युवानेते विवेक कोल्हे यांच्या माध्यंमांतुन संधी मिळाली त्याला न्याय देण्यांचा प्रयत्न केला आहे. शेवटी गटनेते रविंद्र पाठक यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe