अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या दिल्ली भेटीचे कवित्व संपता संपत नसल्याचे दिसत आहे.
पवार यांनी शहा यांना सप्टेंबर महिन्यात पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टि ट्यूट येथे भेटीचे निमंत्रण दिल्याचे सांगण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यात शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
त्यामुळे पवार-शहा यांच्या या दौऱ्यातून राष्ट्रवादी-भाजपमध्ये जवळीक होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांनी नुकतीच अमित शहा यांची भेट घेत सहकार खात्याशी संबंधित मुद्द्यांबाबत तसेच महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवरही चर्चा केली.
यावेळी शहांनी पवार यांना आपण पुढच्या महिन्यात पुण्यात वैकुंठभाई मेहता संस्थेच्या कार्यक्रमासाठी येत असल्याचे सांगितले तेंव्हा पवार यांनी त्यांना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला भेट देण्याचे आमंत्रण दिले आहे. त्याला शहा यांनी सकृतदर्शनी होकार दिल्यामुळे शहा-पवार यांच्या राजकीय जवळकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम