अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- पाय दुखणे आणि सूजेमुळे अनेकजण त्रस्त आहेत. या समस्येवर सातत्याने त्रस्त असल्याने पायाच्या सूजेवर घरगुती उपाय शोधू लागतात. जे या समस्येपासून मुक्त होण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतात.
पायात सूज येणे ही कारणे अनेक असू शकतात. याज प्रामुख्याने थंडी वाटणे, जास्त पाण्यात रहाणे, गरम गोष्टींचे सेवन केल्याने देखील पायांची सूज येवू शकते. तसेच चुकीची जीवनशैली, पोषण अभाव, शारीरिक हालचालींचा अभाव किंवा लठ्ठपणामुळे देखील उद्भवू शकते.
काही लोकांचे वजन देखील नियंत्रणाखाली असते, तरीही पायात सूज येते. या प्रकरणात पायाला सूज कमी करण्यासाठीचे घरगुती उपचार उपयोगी ठरतात. परंतु त्याची कारणे समजून घेणे आणि त्यास सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
पायात सूज येण्यापासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपचार आहेत, जे प्रयत्न करुन वेदना आणि सूजपासून आराम मिळवू शकता. यातून अराम पडण्यासाठी काही घरगुती उपचार केल्यास सूज नक्की कमी करता येईल. चला जाणून घेऊया काय आहेत ते उपचार!
१) जाडे मीठ पाण्यात टाकून शेक घ्यावा :- जाडे मीठ म्हणजे हाइड्रेटेड मॅग्नीशियम सल्फेटचे क्रिस्टल असतात, जे स्नायुंमधील वेदनेपासून आराम मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अर्धा कप जाडे मीठ गरम पाण्याने भरलेल्या एक टब किंवा बादलीमध्ये टाकावे. आता या पाण्यात १० ते १५ मिनिटे आपले पाय बुडवून ठेवावे. मिठातील हाइड्रेटिड मॅग्नीशियम सुजेवर हळूहळू परिणाम करून पायांना आराम मिळवून देतं.
२) तांदूळ व बेकिंग सोड्याची पेस्ट :- बेकिंग सोडामध्ये अँटी-इंफ्लामेट्री गुणधर्म असतात. तांदळाच्या पाण्यासोबत मिसळून हा बेकिंग सोडा पायात जमा असलेले अतिरिक्त पाणी शोषून घेतो आणि यामुळे पायातील रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो. दोन चमचा तांदूळ पाण्यात उकडावे. आता या पाण्यात दोन चमचा बेकिंग सोडा टाकून याची पेस्ट बनवा आणि पायांवर याचा लेप १५ मिनिटे लावा. या उपायामुळे तुम्झाला त्वरित परिणाम जाणवू लागेल आणि पायाची सूज लवकर कमी होईल.
३) इसेन्शियल ऑईल :- हे इसेन्शियल ऑईल पायातील वेदना आणि सूज कमी करण्यासाठी खूप गुणकारी असते. इसेन्शियल ऑईल पाण्यात टाकून मिक्स करावे. तुम्ही हे मिश्रण अधिक प्रभावी बनवण्यासाठी यात अर्धा कप जाडे मीठ सुद्धा टाकू शकता. या पाण्यात १५ मिनिटांसाठी आपले पाय टाकून ठेवा. तुम्हाला यूकेलिप्टस, पेपरमिंट, लेमन इसेन्शियल ऑईलचे ३ ते ४ थेंब आणि अर्धी बादली गरम पाणी घ्यायचे आहे. हे मिश्रण तुमच्या पायाच्या वेदनेवर परिणाम करून पायाची सूज लवकर कमी करते.
४) बर्फाने शेक द्यावा ;- एका स्वच्छ कपड्यात ४ ते ५ बर्फाचे तुकडे घेऊन ज्या ठिकाणी सूज आली आहे त्या ठिकाणी किमान १० मिनिटे तरी शेक द्यावा. बर्फ लावल्याने रक्तप्रवाह अधिक चांगला होतो आणि यामूळेच सूज आणि वेदना सुद्धा कमी होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम