अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना आणि आरोग्य सेवा समन्वय समिती व इतर मित्र सहकारी संघटनांची संयुक्त समन्वय कृती समितीच्यावतीने आज (दि.9) रोजी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या शासन पातळीवर प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. कामकाज सुरूच ठेवण्यात येणार आहे, केवळ काळ्या फिती लावून हे कामकाज करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नेमक्या काय आहेत मागण्या? जाणून घ्या
केंद्रीय कर्मचार्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता लवकर लागू करणे
एक तारखेला वेतन खात्यात जमा होणे
वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करणे
नोव्हेंबर 2005 पासून नियमित सेवेत असलेल्या सर्व संवर्गातील कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे
पदोन्नतीच्या त्रुटी दूर कराव्यात
कर्मचार्यांची प्रलंबित देयके अदा करावीत
या मागण्यांसाठी आज क्रांतिदिनी काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर आंदोलन करणार आहोत, भोजन कालावधीत 15 मिनिटे घोषणा देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम