महाविकास आघाडी सरकारने दोन कोटी रुपये निधी मंजूर केला – आमदार आशुतोष काळे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारने दोन कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव तालुक्यात मागील पाच वर्षात रस्ते विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील जनता खराब रस्त्यांना वैतागली होती. महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते व पूल दुरुस्तीसाठी लेखाशीर्ष ३०५४/२४१९ अंतर्गत दोन कोटी रुपये निधी मंजूर केला.

यामध्ये दहेगाव येथील विलास देशमुख घर ते गुलाबराव देशमुख घर-१६ लाख रुपये, वेस येथील मच्छिंद्र कोल्हे घर ते जालिंदर कोल्हे घर-२० लाख, जेऊर कुंभारी येथील राज्य मार्ग १२ ते संजयनगर वस्ती-२० लाख, सुरेगाव येथील सुरेगाव गावठाण ते यशवंत निकम घर रस्ता-२६ लाख,

धामोरी येथील धामोरी वेस रस्ता ते बाळासाहेब दरेकर शेती रस्ता -२० लाख, सोनारी येथील पुंजाबा सांगळे घर ते ज्ञानदेव पवार घर रस्ता -१० लाख, कोळपेवाडी येथील गाव ते राज्य मार्ग ७ रस्ता -४० लाख, नाटेगाव रस्ता -१६ लाख, वारी येथील महेश टेके घर ते कोळनदी रस्ता-८ लाख आदी रस्त्यांचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!