लाचखोरी प्रकरणात फरार असलेल्या ‘त्या’ शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- आठ लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात फरार असलेल्या शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली वीर झनकर यांना अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

या लाचखोर प्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र त्या पोलिसांना चकमा देऊन पसार झाल्या होत्या. दरम्यान ठाणे ACB धडाकेबाज कारवाई करत शिक्षणाधिकारी वैशाली यांना अटक केली आहे.

सोमवारी नाशिकच्या जिल्हा परिषदेसमोर शिक्षण संस्थाचालकांकडून झनकर यांच्या शासकीय वाहनचालकाने आठ लाख रुपयांची स्वीकारली होती. त्याला एसीबीने ताब्यात घेतले होते. मात्र रात्री सात वाजेनंतर महिला आरोपीला अटक करता येत नाही. या कायद्यातील नियमाचा फायदा घेऊन झनकर यांनी मंगळवारी सकाळी हजर राहू,

असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लेखी लिहून दिले होते. मात्र त्यानंतर मंगळवारी सकाळी फरार झाल्या होत्या. या प्रकरणात शासकीय वाहन चालक आणि एका शिक्षकाला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान, वैशाली झनकर यांनी काल नाशिकच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र त्यापूर्वीच ठाणे एसीबीने धडाकेबाज कारवाई करत वैशाली झनकर यांना बेड्या ठोकल्या. गेल्या दोन दिवसांपासून वैशाली यांचा शोध सुरु होता. अधिकारी पल्लवी ढगे यांनी त्यांना अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe