चेन्नई सुपरकिंग्ज संघ अडचणीत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- चेन्नई सुपरकिंग्ज आपला स्टार फलंदाज फाफ डू प्लेसिसच्या दुखापतीमुळे अडचणीत येऊ शकतो. दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर प्लेसिसने कन्कशनमुळे इंग्लंडच्या द हंड्रेड स्पर्धेतून माघार घेतली.

आता त्याच्या आयपीएलच्या उर्वरित सत्रात खेळण्यावरदेखील शंका आहे. प्लेसिस डोक्याला लागलेल्या जुन्या दुखण्यामुळे त्रस्त आहे. ती दुखापत पुन्हा एकदा उद‌्भवली.

वैद्यकीय समितीच्या सल्लानंतर तो काही दिवस क्रिकेटपासून दूर राहील. आगामी दिवसांत आयपीएल व कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये प्लेसिसला सहभाग घ्यायचा होता, मात्र तो निर्धारित वेळेत तंदुरुस्त न झाल्यास दोन्ही स्पर्धांबाहेर होऊ शकतो.

३७ वर्षीय प्लेसिसने आयपीएल २०२१ च्या सत्रातील सुरुवातीच्या ७ सामन्यांत १४५.४५ च्या स्ट्राइक रेटने ३२० धावा काढल्या होत्या.

तो सर्वाधिक धावा करणारा लीगमध्ये अव्वल-५ मधील तिसरा खेळाडू आहे. दुसरीकडे, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएलसाठी यूएईत दाखल झाला आहे. तो फ्रँचायझीच्या प्लेरूममध्ये वेगळ्या पद्धतीत स्नूकर खेळताना दिसला. उर्वरित सत्रातील पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी चेन्नई-मुंबई यांच्यात खेळवला जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe