गूगल मीट आणि झूमला स्वदेशी पर्याय ‘वयम्’ लॉन्च

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ असूनही भारतीय अॅप सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या टॉप १० व्हिडिओ कम्युनिकेशन अॅपमध्ये समाविष्ट नाहीत. कारण बाजारात विदेशी अॅपचे वर्चस्व आहे. परिणामी देशाची सुरक्षितता आणि यूझर्सच्या डेटाला जास्त धोका निर्माण होऊ शकतो.

गूगल मीट आणि झूम यांसारख्या पाश्चिमात्य अॅपना स्वदेशी पर्याय देण्याच्या उद्देशाने बी२बी टेक आधारीत प्रगत व्हिडिओ कम्युनिकेशन्स स्टार्टअप सुपरप्रोने मेक इन इंडिया अंतर्गत ‘वयम्’ हे भारताचे नवीन व्हिडिओ कम्युनिकेशन अॅप लॉन्च केले आहे.

भारतीय वापरकर्त्यांची श्रद्धा आणि देशाच्या सार्वभौमत्वाला मान देणाऱ्या पहिल्या देशांतर्गत प्लॅटफॉर्मपैकी हे एक असेल. सत्संग, आरती, पूजा, कीर्तन इत्यादी विविध भारतीय संकल्पनांनुसार व्हर्चुअल रुम डिझाइन करण्याच्या क्षमतेसह, ‘वयम्’ हे मेड इन इंडिया अॅप भारतीय यूझर्सना एक आभासी अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

महामारीमुळे लोकांना एकत्र येण्याची तसेच सण साजरे करण्याची क्षमता मर्यादित झाली आहे. त्यांच्या परंपरा साजऱ्या करण्यासाठी व्हिडिओ कम्युनिकेशन्स टूल्स हे सहज उपाय प्रदान करतात. याच प्रक्रियेला अधिक सक्षम करण्यासाठी ‘वयम्’ प्रत्येक प्रसंगासाठी यूजर्सना रिअल लाइफ अनुभव देण्याकरिता एक विशेष व्हर्चुअल रुम तयार करेल.

आतापर्यंत वयम् ने संघ समूहासाठी गुरुपौर्णिमा उत्सव, रूट्स२ रूट्स या सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमांवर भर असणारी स्वयंसेवी संस्थेकरिता आणि रामायण-गीता कथा कार्यक्रमांसह ब्रह्मकुमारींसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

आयआयटीमधील उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी पाठिंबा दिलेले ‘वयम्’, हे वर्धिक वैशिष्ट्यांसह, यूझर्सना विश्वासार्ह, सुरक्षित आणि वापरण्यास सोपे, ‘मेक इन इंडिया’ असे व्हिडिओ कम्युनिकेशन समाधान आहे. सुपरप्रो.

एआयचे संस्थापक आणि सीईओ श्री गौरव त्रिपाठी :- म्हणाले, “भारतातील व्हिडिओ कम्युनिकेशन मार्केटमध्ये गूगल आणि झूमसारख्या पाश्चिमात्य अॅपचे मोठ्या प्रमाणावर वर्चस्व आहे.

‘गो व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ वर अधिक भर देत, भारतीय यूझर्सना अधिक अनुभव देण्याचा तसेच देशातील समृद्ध व विविधतेच्या संस्कृतीचे आवाहन करण्याचा ‘वयम्’ चा उद्देश आहे.

वयम् चा भारतात प्रथमच असण्याचा दृष्टीकोन समोर ठेवत, यूझर्सना सांस्कृतिकदृष्ट्या जोडण्याचा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव देईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

ते पुढे म्हणाले, :- “जसे की, आम्ही आरएसएसमध्ये गुरूपौर्णिमा उत्सवासाठी’ एक सजवलेले व्यासपीठ तयार केले होते, जिथे स्वयंसेवक या उत्सवाचा वास्तविक आनंद घेऊ शकतील.

अशा कार्यक्रमांद्वारे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला आकर्षित केले जाते. एवढेच नाही तर सुरक्षिततेची खात्री आणि ‘मेक इन इंडिया’ प्रतिज्ञेला प्रोत्साहन देत लोकांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची सुविधा मिळते.

‘वयम्’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘आपण’ असा होतो. या प्लॅटफॉर्मद्वारे आपण स्वदेशी या अर्थाने पाश्चिमात्य प्रभावांवर मात करत, भारतीय यूझर्ससाठी सुरक्षित जागा निर्माण करू.

” यूझर्स https://vayam.app वर क्लिक करून, त्यांचा तपशील भरून, ‘क्रिएट माय अकाउंट’ वर क्लिक करत हा प्लॅटफॉर्म वापरायला सुरुवात करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe