रानू मंडल पुन्हा एकदा झाली व्हायरल ! ‘बसपन का प्यार’ …

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- एक प्यार का नगमा है गाणे गाऊन लोकप्रिय झालेली रानू मंडल अचानक पुन्हा गायब झाली होती. त्यानंतर ती कुठे आहे?, काय करते असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता पुन्हा एकदा तिचा गाणं गातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सध्या छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात राहणाऱ्या सहदेव याच्या ‘बचपन का प्यार’ या गाण्याच्या व्हायरल व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. त्याचा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की तो एक सोशल मीडिया सेन्सेशन बनला आहे. आजकाल, सहदेव दिरडो आणि बादशाह यांचं ‘बसपन का प्यार’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे गाणे यूट्यूबवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत असताना, दुसरीकडे, इंस्टाग्रामवरही त्यावर अनेक रील बनवल्या जात आहेत.

दरम्यान, रानू मंडलचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यात ती बसपन का प्यार गाताना दिसत आहे. सेक्रेड अड्डा नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sacred Adda (@sacredadda)

या व्हिडिओमध्ये, एक माणूस कॉलर माइक धरून आणि रानू मंडल, एकत्र उभे असल्याचं दिसत आहे, सुपरहिट गाणं बसपन का प्यार गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ खूप छोटा आहे.

मात्र रानूचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा सहदेवचा व्हिडिओ शाळेचा गणवेश घातलेला एक मुलगा शिक्षकांसमोर ‘बसपन का प्यार भूल नहीं जाना रे’ गाताना दिसतो. या मुलाचं नाव सहदेव आहे. जो छत्तीसगडला राहतो. जेव्हा सहदेवने हे गाणं गायलं होतं त्यावेळी तो दोन वर्षांचा होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News