अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- खोबरेलतेल आरोग्य व सौंदर्य याशिवाय घरातील कामांमध्येही वापरता येऊ शकते. जाणून घेऊ याचे फायदे. . .
– कपड्यांवर ज्यूस, चहा, कॉफीचे डाग पडले असल्यास ते हटवण्यासाठी वाटीत समप्रमाणात खोबरेल तेल व बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा व ती डागाच्या जागी पाच मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर धुवा. डाग जातील.
– एक वाटी खोबरेल तेलात १-१ मोठा चमचा व्हिनेगर व लिंबाचा रस मिसळून कॉटनने फर्निचरवर घासा. फर्निचर चमकू लागेल.
– एका स्प्रे बॉटलमध्ये दोन मोठे चमचे खोबरेल तेल, ४-५ थेंब टी-ट्री वा पेपरमेंट ऑइल मिसळा. हे त्वचेवर स्प्रे केल्यास डास चावण्याच्या त्रासापासून सुरक्षित राहाल.
– कपड्यावर वा कार्पेटवर लागलेले च्युइंग गम हटवण्यासाठी त्यावर काही थेंब खोबरेल तेल टाकून हळुवारपणे ते हातांनी काढून घ्या ब पाण्याने साफ करून घ्या.
– जुन्या दारांचा आवाज येत असल्यास खोबरेल तेलाचे ५-६ थेंब लावून ते बंद करून उघडा.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम