जिल्ह्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी त्वरित खुली करावी; अन्यथा आंदोलन छेडू

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यासह जिल्ह्यातील सर्व मंदिरे बंद आहेत.

त्याच्या निषेधार्थ नगर मंदिर बचाओ कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते वसंत लोढा

यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना निवेदन देऊन तातडीने सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करावी, अन्यथा मंदिर बचाओ कृती समिती तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला.

यावेळी बोलतांना लोढा म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देत आता सर्व व्यवहार सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. परंतु भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सर्व मंदिरे बंद आहेत.

याचा निषेध मंदिर बचाओ कृती समिती करत आहे. सर्व देवी-देवतांचे व साधू-संतांचे मंदिरे हे समस्त हिंदू जणांचे शक्तीस्थळे आहेत. शासनाने भाविकांच्या मानसिकतेचा अंत पाहू नये.

शक्ती आणि भक्ती एकत्र आल्यास भाविक उद्रेक करतील. नगर जिल्ह्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी त्वरित खुली करावी, अन्यथा मंदिर बचाव कृती समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

तसेच मंदिरे त्वरित उघडण्याची मागणी करत मंदिरे बंद असल्यामुळे मंदिरांवर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe