अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-देशाचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जतमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तिरंगा उलटा फडकला.
उलटा फडकलेला तिरंगा पाहण्यासाठी कर्जतकरांनी मोठी गर्दी केली होती. स्टेट बॅंकेच्या या हलगर्जीपणाबददल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
देशाचा ध्वज उलटा फडकला हा देशाचा अपमान मानला जात असतो. कर्जत- कुळधरण रोडलगत शहाजीनगर भागात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. कर्जत तालुक्यातील ही एकमेव शाखा आहे.
दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी ध्वजारोहण सोहळयालाच दांडी मारली असल्याची माहिती समजते आहे. येथे अवघ्या तीन कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहण केले.
ध्वजाला सलामी नाही, राष्ट्रगीत नाही. फाॅरमेलीटी म्हणून झेंडावंदन केले. या सगळ्यात कर्मचाऱ्यांनी बँकेच्या शाखेत उलटा ध्वज फडकवला. या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम