जलतरणपटू निल सचिन शेकटकर याचाा सत्कार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- जलतरण ही एक अवघड कला आहे आणि अशा कलेत चि.निल याचे समुद्रात पोहून आपल्या शौर्याची अनभुती सर्वांना दाखवून दिली आहे. बालवयात त्याने केलेली कामगिरी ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

नुकत्याच झालेल्या ऑलंपिक स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करुन पदके मिळविली आहेत. चि.निल हाही भविष्यात अशीच कामगिरी करुन देशासह नगरचे नाव नक्कीच मोठे करेल. त्याच्या पुढील कार्यास आपले सहकार्य राहील. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

जलतरणपटू निल सचिन शेकटकर याने ऐलिफंटा ते गेट ऑफ इंडिया हे 14 कि.मी.चे अंतर 2 तास 45 मिनिटात पोहून पूर्ण केले. त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली. त्याबद्दल त्याचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विनोद कटारिया, ज्ञानेश देशपांडे, संतोष जाधव, नितीन वाघ, संजय भंडारी, जितेंद्र कुलकर्णी योगेश फुटाणे, प्रशांत फुलसौंदर, उमेश क्षीरसागर, विठ्ठल गालपेल्ली, दिपक मोरे, सचिन शेकटकर, हेमांगी शेकटकर, संभाजी पवार आदि उपस्थित होते.

याप्रसंगी विनोद कटारिया म्हणाले, चि.निल यांच्यातील गुण हेरुन त्याचे वडिल सचिन शेकटकर यांनी त्याला दिलेले प्रोत्साहन हे चि.निलला यशाच्या शिखरावर नेणार आहे.

मित्र परिवारांच्या सदिच्छा त्यांच्या नेहमीच बरोबर राहतील. चि.निलचे यशाचे इतर मुलांनाही प्रोत्साहन मिळणार आहे, असे सांगून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सचिन शेकटकर यांनी निलने विविध स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाची माहिती दिली. शेवटी संतोष जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe