त्याने खून केला तर मी त्याच्यासोबत झोपेन’ अभिनेत्रीचं खळबळजनक..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- आंध्र प्रदेशातील विद्यार्थिनीच्या हत्येनंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पण विविध स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

आता टॉलिवूड अभिनेत्रीने यावर खळबळजनक प्रतिक्रीया दिली आहे. तेलुगू अभिनेत्री रेखा बोजने या प्रकरणी धक्कादायक विधान केलं आहे. रेखाने या प्रकरणी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तिने आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे. रेखा म्हणाली, जो त्या मुलाची हत्या करेल त्याच्यासोबत मी झोपेन. कारण हा धक्कादायक व्हिडिओ बघून मी इमोशनल झाले आहे. मला माफ करा.

आपण आज किती हतबल आहोत. रामयाला न्याय मिळायलाच हवा”. गुंटूर जिल्हातील इंडिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची भररस्त्यात चाकूने हत्या करण्यात आली. इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षातील ही विद्यार्थिनी आपल्या घरी जात होती.

तेव्हा एका तरुणाने तिला बाईकवर बसायला सांगितलं. पण तिने नकार दिल्याने त्याने तिच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe