पर्यटकांसाठी खुशखबर ! कास पुष्प पठार ‘या’ दिवशी पासून खुले होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :-  जागतिक वारसा स्थळ असणार्‍या कास पुष्प पठारावरील हंगामाची सुरुवात दि. २५ ऑगस्टपासून करण्याचा निर्णय कास पठार कार्यकारी समिती व वनविभाग जावली – सातारा यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

कास पुष्प पठारवरील नैसर्गीक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं करण्यात येणार असुन कोरोनाचे नियम पाळत ऑनलाईन बुंकींगने पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय वनसमीतीच्या बैठकीत घेण्यात आला हंगाम पर्यटकांना खुला करण्याच्या हलाचालींना वेग आला असुन हंगामाच्या नियोजनाची बैठक बुधवारी पार पडली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने कास पठाराच्या संयुक्त कार्यकारी वन समितीने बैठक आयोजित करून पुष्प पठार पर्यटकांसाठी येत्या २५ ऑगस्टनंतर खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २१ ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

“फुलांचा हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून कर्मचारी प्रशिक्षण व इतर आवश्यक तयारी झाली. २५ ऑगस्टनंतर दोन-तीन दिवसांत अधिकृतपणे हंगाम सुरू करण्यात येईल.”, असं वनक्षेत्रपाल आर एस परदेशी यांनी सांगितलं.

  • पर्यटकांसाठी महत्वाची सूचना करोनाचे नियम पाळून ऑनलाइन बुकिंगनेच पठारावर प्रवेश दिला जाणार आहे
  • यासाठी प्रति माणसी १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.
  • वाहन पार्किंग, गाईड शुल्क, बस प्रवास, कॅमेरा शुल्क आदींसह अन्य शुल्कही द्यावे लागणार आहेत.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe