अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- झायडस कॅडिला कंपनीच्या कोविड -19 वरील लस झायकोव्ह-डी (ZyCov-D)च्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
देशात कोव्हिशिल्ड, को-व्हॅक्सिन, स्पुटनिक, मॉर्डनानंतर उपलब्ध होणारी ही पाचवी लस आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा आणखी मजबूत होणार आहे झायडस कॅडिलाची लस कोविड -19 विरूद्ध ही एका प्लाज्मिड डीएनए लस आहे, असा असा दावा कंपनीने केला आहे.
झायडस कॅडिला लसची चाचणी 28,000 हून अधिक व्हॉलिन्टियर्सवर केली गेली आहे. त्यामुळे या लसीला मंजुरी मिळाल्यामुळे केवळ प्रौढच नव्हे तर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना देखील लाभ होणार आहे.
बंगळुरूस्थित औषधनिर्माण कंपनी झायडस कॅडिलाने दिलेल्या माहितीनुसार, ही लस इंजेक्शनच्या मदतीशिवाय फार्माजेट तंत्रज्ञानाद्वारे दिली जाणार आहे. या तंत्राचा वापर केल्यास लसीनंतर दुष्परिणाम होण्याचा धोका कमी होईल.
या लसीला मंजुरी मिळाल्याने कोरोनाला रोखण्यासाठी ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस असेल आणि देशातील सहावी उपलब्ध लस आहे. डीएनए-प्लाज्मिड आधारित ‘झायकॉव्ह-डी’ लसचे तीन डोस असतील.
लस दोन ते चार डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवता येते आणि कोल्ड चेनची आवश्यकता नसते. याद्वारे त्याची खेप सहजपणे देशाच्या कुठल्याही भागात जाऊ शकते
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम