अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांकडून संपूर्ण शहरांवर कब्जा करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून भारतीयांची सुटका करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रणनीती आखण्यात येत आहे. सकाळी 10.30 वाजता 85 भारतीयांना घेऊन भारतीय हवाई दलाचं C-130J विमान भारतात परतत आहे.
असे सांगितले जात आहे. परंतु उर्वरीत भारतीय नागरिक काबूल विमानतळावर प्रतीक्षेत होते. मात्र, अफगाणिस्तानात 150 भारतीय नागरिकांचं अपहरण केल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही भारतीयांचं अपहरण केलंलं नाही, आम्ही त्यांना सुरक्षित स्थळी नेलं आहे, असा दावा तालिबान्यांच्या प्रवक्त्यांनी केलेला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/08/Afghanistan-640.jpg)
मिळालेल्या माहितीनुसार, अंतर्गत संघर्ष तालिबानमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये खूप मोठा आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आपलं शक्तीप्रदर्शन करण्यासाठी म्हणून भारतीयांना भोगावा लागू शकतो. परंतु तालिबान्यांच्या तावडीतून भारतीयांची सुटका करणं. हे आता भारताला मोठं आव्हान ठरणार आहे.
मात्र, तालिबान्यांवर विश्वास ठेवायचा कसा? हा देखील मोठा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर भारताकडून आपल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. दूतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं.
मात्र अजूनही अफगाणिस्तानमध्ये मोठ्या संख्येनं लोक अडकले आहेत. दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली असून स्पेशल अफगानिस्तान सेल तयार करण्यात आला आहे.
16 ऑगस्टच्या संध्याकाळी परराष्ट्र मंत्रालयाने एक विशेष अफगाणिस्तान सेलची स्थापना केली. ज्याचं उद्दिष्ट अफगाणिस्तानकडून मदतीसाठी आलेल्या विनंतीवर मॉनिटर करणं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम