अन संतप्त शेतकऱ्याने ट्रकभर टोमॅटो फेकले रस्त्यावर…!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- एकीकडे खते बियाणांचे दर गगनाला भिडले आहेत ,मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे.

कोणत्याही मालास योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले असून, त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

महागडी बियाणे खते व प्रचंड मेहनत करून पिकवकेल्या टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने निराश झालेल्या शेतकर्‍याने चक्क ट्रकभर टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले.

ही घटना पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथे घडली. गणेश अजीनाथ थोरे शेतकऱ्याने टोमॅटोचे पीक घेतले होते मात्र मालाला योग्य भाव न मिळाल्याने या शेतकर्‍याने ट्रकभर टॉमेटो रस्त्यावर फेकले.

टॉमेटो फेकल्यानंतर त्या ठिकाणावर जनावरे चरत होती. पैठण तालुक्यातील केकत जळगाव या गावात टोमॅटोचे चांगले पीक आले आहे. पण टोमॅटोचे भाव मात्र कोसळले आहेत.

अगदी दोन ते तीन रुपये किलो टोमॅटोला अल्प भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना टोमॅटोची वाहतूक करणेही परवडत नाही. जेवढा खर्च त्यांच्या उत्पादनाला लागला, तेवढा खर्चही निघत नाही, अशी खंत या शेतकऱ्यांने व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe