अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद वाढला, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्याचा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला आहे.
शरद पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओचा कार्यक्रम घेतला होता. तेव्हा तुम्हाला पवारांबद्दल कळलं नाही का?, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी शरद पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओ हा कार्यक्रम घेतला होता, तेव्हा पवारांसोबत दौरे करत होते. तेव्हा त्यांना पवारांबद्दल कळलं नाही का? असा सवाल मुश्रीफ यांनी केला.
राज यांना भाजपसोबत सलगी करायची आहे. पण त्यांनी परप्रांतियांबाबत जी भूमिका मांडलेली आहे. त्यावर भाजप आडून बसला आहे. ते धुवून काढण्यासाठीच ते राष्ट्रवादीला टार्गेट करत असावेत.
त्यांनी एकत्र यावेत, दोघांनी एकत्र संसार करावा पण राष्ट्रवादीला बदनाम करण्याची गरज काय?, असा सवालही मुश्रीफ यांनी केला आहे.यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली आहे.
भाजपचे राज्यातील नेते मध्यंतरी दिल्लीत गेले होते. त्यानंतर महाराष्ट्र भाजप शांत झाला आहे. दिल्लीतून आल्यापासून त्यांची आदळआपट कमी झाली आहे, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम