अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यकारिणीची घोषणा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधी जी व काँग्रेसचे नेते मा. राहुल गांधी जी यांच्या मान्यतेने करण्यात आली.
अहमदनगर शहरातून माजी महापौर व शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांची ”सचिव” पदी नियुक्ती करण्यात आली.

पक्ष नेतृत्वाने माझ्यावर पक्ष वाढीसाठी काम करण्याची संधी देऊन विश्वास दाखविल्याबद्दल विधिमंडळ पक्षनेते, महसूल मंत्री ना बाळासाहेब थोरात साहेब, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे तसेच आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे यांचे आभार मानले.
यावेळी श्री चव्हाण यांनी महाराष्ट्राचे सर्व प्रभारी व राज्यातील सर्व मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये अधिक मजबूत करण्यासाठी व सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम