कामगारांनी चुकीच्या पद्धतीने आंदोलन केल्यास कारवाई करू, तनपुरे कारखान्याचे चेअरमन ढोकणेंचा इशारा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- डॉ. तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी प्रवरा कारखान्याच्या कर्मचार्‍याला काळे फासून चुकीचे कृत्य केलेले आहे. कायदा हातात घेत चुकीचे कृत्य होत असल्यास संचालक मंडळ सहन करणार नाही.

कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा होत आहे. लवकरच तोडगाही निघेल. परंतु चुकीच्या पद्धतीने आंदोलन होत असल्यास संचालक मंडळ कायदेशिर कारवाई करेल असा ईशारा कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांनी दिला. तनपुरे कारखाना कामगारांचे मागण्यांबबाबत डॉ. सुजय विखे यांसह सर्व संचालक मंडळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे.

कारखान्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही खासदार डॉ. सुजय विखे व संचालकांनी पदरमोड करून कारखाना चालविला. कारखान्यामध्ये कोणत्याही प्रकारची उधळपट्टी न करता सर्व देणी देण्यासाठी प्रयत्न केला. मागिल काळातील थकीत एफआरपीची रक्कम 12 कोटी तसेच जिल्हा बँकेची देणी देण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न केला.

संबंधित रक्कम अदा केल्यानेच कारखान्याकडे आर्थिक उपलब्धता कमी आहे. त्यावरही योग्य मार्ग काढून कामगारांना देणी देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा होत होती. लवकरच मार्गही निघेल असे दिसत असतानाच कामगारांनी आंदोलनाला हिंसक वळण देत कारखाना कार्यस्थळी चुकीचा प्रकार केला आहे.

कामगारच दुसर्‍या कामगारांना काळे फासत आहे हे कृत्य निषेधात्मक आहे. त्यामुळे कारखान्याचे सर्व संचालक मंडळासह सभासदांमध्ये कामगारांच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. कामगारांनी आपल्या मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून मांडाव्यात.

परंतु कायदा हातात घेऊन कारखान्याची नुकसान करणे किंवा अवैध कृत्य होत असल्यास संचालक मंडळ सहन करणार नाही. कामगारांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे.

पैशाची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कामगारांनी कायदा हातात घेऊ नये, आंदोलनाला हिंसक वळण देत अवैध कृत्य केल्यास कायदेशिर कारवाई केली जाईल असा ईशारा कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News